Shahu Maharaj

Rare photos of  Shahu Maharaj 

 

 

राजर्षी शाहू महाराज !!

हजारो राजे झाले, मात्र माणसातला राजा, राजातला माणूस हाच आणि असा सन्मान लाभणारा हाच राजा.

वारसा नेमका कशाचा असतो हे लख्खपणे समजलेला राजा.

आजच ह्या राजाला का आठवायच ?

जेव्हा महाराष्ट्रातल्या आदिवासी, डोंगराळ, दुर्गम, ग्रामीण भागातल्या शाळा ‘ परवडत नाहीत ‘ म्हणून नादान राज्यकर्ते बंद करायला निघतात तेव्हा तब्बल शंभर वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा मंजूर करून अंमलात आणणारा हा राजा आठवायचा.

जेव्हा शिक्षण व्यवस्था भांडवली हातात देऊन बटिक करायला राज्यकर्ते आतुर झालेले आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात बहुजनांच्या शिक्षणासाठी बोर्डिंग, शाळा उघडायला सढळ हस्ते मदत करणारा राजा आठवायचा.

जेव्हा दलित समाजातल्या माणसाला घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणून मारहाण केली जाते तेव्हा शंभर वर्षापूर्वी दलित माणसाला आपल्या गावात हॉटेल काढून देऊन तिथे चहा प्यायला जाणारा राजा आठवायचा.

जेव्हा ऑनर किलिंग सारखा हिडीस प्रकार बोकाळलेला असताना, पोटच्या लेकरांचे जीव घेणारे हैवान असताना शंभर वर्षापूर्वी आपल्याच घरात मराठा धनगर विवाहाला पुढाकार घेणारा राजा आठवायचा.

जेव्हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फीचे पैसे सरकारने दिले नाहीत म्हणून पदवी प्रमाणपत्र मिळायला अडवल जात तेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या मागे उभा राहणारा राजा आठवायचा.

जेव्हा महाराष्ट्रात लेकीबाळी हंडाभर पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर पायपीट करतात तेव्हा दूरदृष्टी दाखवून धरण बांधून सिंचनाची सोय करणारा राजा आठवायचा.

जेव्हा लोकशाही मार्गाने लोककल्याणकारी राज्यव्यवस्था राबवणे अपेक्षित असलेल सरकार भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्यात दंग होत तेव्हा मर्यादित अधिकार आणि संसाधन असताना लोककल्याण साधणारा राजा आठवायचा.

पिढीजात वारसा, संपत्ती काहीही पाठबळ नसताना केवळ ज्ञानाच्या जोरावर संपत्ती आणि अधिकार मिळवता येतो हे सांगणारा राजा आठवायचा.

ज्या संस्थेत अहमदनगर जिल्ह्यातली लाखो मुल शिकलीत आणि आजही ती संस्था शंभर वर्षाची झाल्यावर लाखो मुल दरवर्षी शिकतात , त्या संस्थेत शिकण्याच भाग्य मला लाभल , त्या संस्थेची पायाभरणी करणारा राजर्षी !!

राजर्षी शाहू महाराज !!
त्रिवार मुजरा !!

 

जन्म : 26 July, 1874.

मृत्यु : 6 May, 1922
 
– – –

शाहू महाराज हे खरया अर्थाने एक जाणते आणि जनतेच्या भल्याचे पहाणारे , दूर दृष्टी असणारे राजे, संस्थानिक होते, त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला सारांश …

१) कोल्हापुर संस्थानात ” राजाराम विद्यालय ” ची स्थापना आणि दिन दलित विद्यार्थाना विशेष सवलत देण्यात आली
२) ब्राह्मणेतर विद्यार्थ्यां साठी मोफत वसतिगृह उभारले
३) स्त्री शिकाशानावर भर आणि त्याचा प्रसार आणि आपल्या भाषानातुन प्रसार
४) विद्यार्थ्याना त्यांचे शिक्षण पूर्ण होत आले की नोकरी ची तरतुत असणारी पहिली व्यवस्था शाहू महाराजानी सुरु केलि ( ज्याला आज आपण ( CAMPUS INTERVIEWS ) असे म्हणतो.
५) दलित वर्गातील आर्थिक दुर्बल परन्तु शिक्षणाची महत्वाकांक्षा असनारया विद्यार्थाना ख़ास शिष्यवृती आणि नोकरीची हमी दिली.
६) बाल विवाहास संपूर्णतः बंदी तसेच गुन्हा म्हणून जाहिर केले
७) विधवा विवाह आणि आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन आणि मान्यता.
८) ब्रह्मण वर्गाची पुरोहितशाही उखडून फेकन्यासठी ब्रह्मनेतर समाजातील मुलाना पुरोहित / पुजारी बनण्याचे प्रशिक्षण देणारी व्यवस्था करणारे पाहिले राजे
९) या उपक्रमाला भटमान्य टीळक यानी केलेला प्रखर विरोध आणि त्यास तसेच ठोस प्रत्युत्तर देणारे शाहू महाराज
१०) फुले यांच्या सत्यशोधक समाजावर नितांत श्रद्धा आणि आदर परन्तु नंतर आर्य समाजाकडे वाटचाल ..
११) कुस्ती या मर्दानी खेळाची आवड आणि युवाकाना सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन
१२) भारतातील पाहिले राधानगरी धरण बांधले तसेच त्याचे सतत अनुरक्षण केले
१३) भटमान्य टीळक यानी वेद उच्चारण आणि शुद्र / कुनबी राजा असल्याने वैदिक मन्त्र वापरण्यास विरोध केल्याने त्यांच्याशी वाद
१४ ) आपल्या दरबारातील ब्रह्मण पुरोहिताची हकालपट्टी (वरील कारण)
१५ ) खरया अर्थाने छत्रपति शिवाजी महाराजांचे वारसदार आणि त्यांचीच विचारधारा अंगी असणारे लोकहितवादी राजे तसेच सामाजिक न्याय व्यवस्थेचे अग्रदूत, आरक्षणाचे जनक, समान संधी आणि शिक्षण ह्या मुल्यांवर अधिष्ठित समाजव्यवस्थेची कास धरणारे असे राजश्री शाहू महाराज.

* * * * * * * * * *

कोल्हापूरचे महाराज छत्रपती शाहू महाराज हे जरी कोल्हापूर संस्थानचे अधिपती होते तरी त्यांना १९०० साली घडलेल्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळेपासून ब्राम्हण समाजाने नुसते जेरीस आणले होते.

थोडक्यात वेदोक्त प्रकरण सांगावयाचे म्हणजे , दरवर्षी कार्तिक एकादशीला भरणाऱ्या यात्रेदिवशी कोल्हापूरला पंचगंगा नदीवर छत्रपती शाहू महाराज सकाळी आपल्या परिवारासह स्नानाला जात असत. त्यावेळी, महाराज स्नान करीत असता , महाराजांचा ब्राम्हण उपाध्याय स्वतः स्नान करून मंत्र म्हणत असे.

परंतु १९०० साली सदर उपाध्याय वेळेवर आला नाही , त्याने थंडी वाजते या सबबीवर स्नान टाळले व मंत्र म्हणावयाचे ते वैदिक मंत्र न म्हणता ‘ पुराणातील मंत्र म्हणेन , कारण महाराज तुम्ही शुद्र असल्यामुळे तुम्हास वैदिक मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही .’

असे तो महाराजांनाच सांगू लागला . शेवटी त्याने वैदिक मंत्र म्हटले नाही. महाराजांनी त्याला बडतर्फ केले . व नवा उपाधाय्य नेमला पंरतु नव्या उपाध्यायावर सर्व ब्राम्हण समाजाने बहिष्कार घातला .

जलाशयावर ब्राम्हण तरुण दगडफेक करू लागले . महाराजांविरुद्ध ‘केसरी’ आदि ब्राम्हणी वृत्तपत्रातून बेफाम टीका सुरु झाली त्यांची ब्राम्हण वस्तीत निंदा चालविली . ते महाराज जरी होते तरी त्यांना ‘ स्वातंत्र्य ‘ नव्हते असे महाराजांना वाटे मत स्वातंत्र्य म्हणजे काय व व्यक्तीस्वातंत्र्याची जरुरी किती आहे याची अतिशय तीव्र जाणीव त्यांना झालेली होती.
यावरूनच ते नेहमी विचार करीत असत कि एक महाराज असून आपली स्थिती अशी आहे तर अस्पृश्य लोकांची व भीमरावांची स्थिती काय असेल याची कल्पना त्यांना येत होती.

छत्रपती शाहू महाराज व भीमराव हे ऐतिहासिक गरज म्हणून एकत्र आले होते. शाहू महाराज छत्रपती असून देखील भीमराव परेलला ज्या चाळीमध्ये रहात असत तेथे स्वतः मोटार घेऊन त्यांच्या भेटीला येत असत .

त्यांच्या मैत्रीचे दृश्य स्वरूप मार्च १९२० मध्ये कोल्हापूर जिल्यातील माणगाव येथे जि परिषद झाली व ज्या परिषदेचे अध्यक्ष भीमराव होते व पाहुणे शाहू महारज होते, त्या परिषदेने प्रकट झाले . ह्या परिषदेत शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिजात पुढारपणाची घोषणा केली , ” हेच तुमचे खरे पुढारी आहेत; ते तुमचाच नव्हे तर तुम्हा आम्हा सर्वांचा उद्धार करतील अशा प्रकारचे त्यांच्या अंगी गुण आहेत .”

अशी घोषणा करणारे छत्रपती शाहू महाराज , भारतातील नव्हे तर जगातील एकमेव द्रष्टे पुरुष होते. एक राजा असूनही त्यांचे मन किती थोर, दयाळू व या सर्वात अधिक म्हणजे किती दिलदार होते, याची प्रचीती जगाला आल्याशिवाय राहणार नाही.

त्यांनी १९०२ मध्ये क्रांतीचा जाहीरनामा काढला त्यात त्यांनी मागासलेल्या वर्गाना ५० % आरक्षण व राखीव जागा देण्याचा हुकुम केला .राखीव जागांचे धोरण अंमलात आणणारे राजर्षी शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्त्ये ठरले .

* * * * *

Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराज यांना लंडन मधून1921 साली लिहिलेले पत्र आणि बाबासाहेबांचे हस्ताक्षर पहा…

 

 

 

Open chat
1
Jay Bhim, How can I help you?