- ‘निर्भय बनो’ची सभा उद्या सोलापूर येथे होणार आहे ‘निर्भय बनो’ या चळवळीच्या माध्यमातून जे काही सध्या देशामध्ये जे दडपशाहीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे त्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची ही एक मोहीम आहे.
सध्या जी दडपशाही चालू आहे त्या दडपशाहीमुळे अनेकजण चिंतेत आहेत अनेकजण भयाच्या वातावरणात वावरत आहेत तर अशा वेळेस आपल्यातील काही विचारवंतांनी असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि माननीय निखिल वागळेजी यांनी एकत्र येऊन जी काही मोहीम चालवलेली आहे महाराष्ट्र मध्ये ती खरच वाखाण्याजोगी आहे.
मा. निखिल वागळे सरांनी पुणे येथे झालेल्या सभेमध्ये जो निर्धार केला होता कोणत्याही परिस्थितीत सभा होणार म्हणजे होणारच! त्याप्रमाणे अनेक संकटाचा, गुंडाचा सामना करत शेवटी वागळे आणि त्यांची टीम ज्या परिस्थितीत सभा स्थळी पाहोंचलें आणि त्यानंतर चा जल्लोष खरंच वाखानन्या जोगा होता.
त्यामुळे अनेकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि अशातच पुढील सभा ही सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
तरी या सभेला अनेकांनी उपस्थित राहावे संविधान प्रेमी लोकांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन माननीय असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांनी केलेले आहे .
निर्भय बनो सभा नेहमीच्या कार्यक्रमानुसार पुन्हा सुरु झाल्या आहेत.
१६ फेब्रूवारी- गोरेगांव, मुंबई,
२० फेब्रुवारी- अहमदनगर
हा काफिला आता थांबणार नाही.
तर मित्रहो हे संविधानिक राष्ट्र आहे, लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण जरूर या सोलापूर येथील सभेला उपस्थित रहा.
धन्यवाद
जय भीम जय भारत