मित्रांनो ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण एक निश्चय करूयात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्ताच पाणी करून प्रसंगी आपल्या पोटच्या लेकराचा बळी देऊन, आपल्या घर संसाराचा विचार न करता तुमच्या आमच्या उद्धारासाठी कल्याणसाठी देशाच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक असे संविधान या देशाला बहाल केलं, म्हणजे ह्या देशाला लोकशाही बहाल केली असा आपला जीव की प्राण असलेल्या ह्या महान देशाच्या महान राज्य घटनेचे संरक्षण करायचे!
संविधान लागू झाल्यानंतर देश संविधानाच्या नियमाने चालू लागला आणि हे सर्वोत्कृष्ट असं संविधान अंगीकृत करून त्याच्या नियमानुसार देश आणि देशातील जनता चालून खरंच देश प्रगती पथावर गेलेला आपण ह्या गेल्या ७५ वर्षात सर्वांनी पाहिलेला आहे. आपले भारतीय संविधान हे सर्वांसाठी आदर्शवत आहे जगातील सर्वात मोठे लिहिले गेलेले हे एकमेव संविधान आहे त्याविषयी संपूर्ण जगाला ह्याचा हेवा वाटतो. कोणत्याही संकटामध्ये, आणीबाणीच्या काळामध्ये आणि अशी काही एखादी घटना घडली देशावर कोणतं संकट आलं, झालं तर काय करायचं आणीबाणी मध्ये काय करायचं हे सर्व प्रयोजन आपल्या संविधानामध्ये आहे. याचेच सर्व जगातील सर्व राष्ट्रांना आपल्या संविधानाचे आकर्षण आहे.
भारत देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असताना सर्व कसे गुण्यागोविंदाने नांदू लागले हे आपण संविधान लागू झाल्यापासून आपण अनुभवत आहेत. 18 पगड जातींच्या लोकांना एका सूत्रामध्ये बांधून ठेवण्याची ताकद फक्त या आपल्या संविधानामध्ये आहे आणि ते वेळोवेळी सिद्ध झालेल आहे.
संविधानाचे वर्णन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत म्हणतात, “संविधान कितीही चांगल असेल आणि जर राज्यकर्ते जर संविधानाच्या नियमानुसार चालत नसतील तर संविधान कूच कामी ठरेलया शिवाय राहणार नाही. गेल्या काही वर्षापासून आपण हेच पाहत आहोत काही धर्मांध शक्ती देशातील जनतेला धर्माच्या नावाखाली बांधून घेऊन एक विशिष्ट जातीच्या हाती या देशाची दोर देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि यांच्या भुलथापांना सामान्य जनता बळी पडत आहे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून इतर पक्षातील लोकांना इतर नेत्यांना धमकवण्याचा प्रयत्न करून आपल्या दावणीला कसे बांधता येईल हे सत्ताधारी मंडळी सध्या करत असलेला पण सर्वजण पाहत आहात.
लोकशाहीच्या मार्गाने लोकशाही संपवण्याचा कटकारस्थान येथे काही वर्षांपासून चालत आलेले आहे. संविधानाने सर्व जाती-धर्मातील लोकांना आपापले सण उत्सव पाळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले बहाल केलेले आहे आणि त्याच स्वातंत्र्याचा गैरवापर करून एक विशिष्ट धर्म समस्त जनतेवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे जे संविधानिक राष्ट्र आहे त्याला हिंदू राष्ट्र घोषित करा असे जात्यांधशक्ती वारंवार प्रयत्न करीत आहे.
तुमचं आमचं जगणं ज्या संविधानाने सुकर केलं ज्या संविधानामुळे तळागाळातला माणूस सुद्धा ताठमानाने जगू लागला एक व्यक्ती एक मताधिकार हा अधिकार देऊन सामान्यातल्या सामान्य माणसाला समान लेखण्याचा प्रयत्न संविधानाने केला, सर्वाना मुलभूत हक्क दिले आणि आज ह्याच संविधानावर संकट आलेला असताना तुम्ही आम्ही असे गप्प का आहोत?
संविधानामध्ये मूलभूत अधिकार बोलण्याचे स्वातंत्र्य व्यवसाय करण्याचे स्वतंत्र शिक्षणाचे स्वातंत्र्य समानता संधी धर्मनिरपेक्षता असे अनेक मूल्य तुम्हाला देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन भारतीय नेते पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी बॅरिस्टर जीना सरदार वल्लभाई पटेल या सर्व महान नेत्यांनी जणू आपल्या वरती उपकारच केलेले आहे
असे असताना सध्या फ्रीडम ऑफ स्पीच बोलण्याचे स्वातंत्र्य असताना तुम्ही आम्ही एका विशिष्ट दडपशाहीला घाबरून आपण गप्प राहायचे का? आता आपल्याला स्वातंत्र्य असताना आपण गुलामा सारखं जगायचं का? आता बोलायचं नाही तर बोलायचं कधी हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे..
तर चला उठा लागा कामाला संविधान बचाव संविधानाचा विजय असो, जब तक सविधान जिंदा है, मै जिंदा हू असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे तर त्या संविधानाला जिवंत ठेवण्याचे काम तुम्ही आम्ही सर्वजण करूया!
संविधानाचे, या देशाचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, देशभक्तीचे काम करण्यात सर्वांचे भले आहे..
जय भीम,
जय भारत
जय संविधान
ऍड. प्रेमसागर गवळी